महाबळेश्वर : येथे पर्यटनस्थळामुळे (Mahabaleshwar Tourism) स्थानिक टॅक्सी व टूरिस्ट टॅक्सीला पर्यटकांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक स्थळ दर्शन, तसेच पुणे, मुंबई येथे विमानतळ, रेल्वे स्टेशन अथवा त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत सोडण्यासाठी मिळणारे भाडे हेच त्यांच्या व्यवसाय व उदरनिर्वाहाचे साधन आहे.