

Rallies and Corner Meetings Heat Up Mahabaleshwar Civic Polls
Sakal
महाबळेश्वर : येथील पालिकेच्या निवडणूक प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, रॅली, कोपरा सभा, रिक्षांवरील स्पीकर, डिजिटल स्क्रीन असलेल्या प्रचार व्हॅनमुळे शहर ढवळून निघाले आहे. सर्व पक्ष व आघाड्यांचे उमेदवार रस्त्यावर उतरले असून, प्रचाराचे चित्र रंगतदार झाले आहे.