''कोवड १९''च्या संकटातील कर्मचाऱ्यांना महाबळेश्वर पालिकेचा बोनस

अभिजीत खूरासणे
Saturday, 14 November 2020

या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आल्याने पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्याअर्थाने गोड झाली आहे. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या या निर्णयाने कर्मचारी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

महाबळेश्वर : दिवाळी सणानिमित्त महाबळेश्वर पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सुमारे २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. ''कोवड १९''च्या प्रादूर्भावात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता देखील दिला जाणार असल्याने पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या या निर्णयाने कर्मचारी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

राज्यातील ''क'' वर्ग पालिकांमधील सर्वात श्रीमंत पालिका म्हणून महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद ओळखली जाते. दिवाळी सणानिमित्त यंदा पालिका कर्मचाऱ्यांना सुमारे २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या निर्णयाचा पालिकेच्या एकूण १२० अस्थापना कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यासोबतच ''कोविड १९'' प्रादुर्भावात महाबळेश्वर शहर सुरक्षित ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता विभागासह विविध विभागातील एकूण २२२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांचा बोनस देखील दिला जाणार आहे.

तुम्ही एकी ठेवा, बाकीचे मी बघतो; रामराजेंनी दिला नेत्यांना विश्वास  

या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आल्याने पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्याअर्थाने गोड झाली आहे. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या या निर्णयाने कर्मचारी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahableshwar Muncipal Council Decleares Bonus For Workers Diwali Festival 2020 Satara News