महाबळेश्‍वर ट्रेकर्सची भूतदया; 80 फूट विहिरीतून कुत्र्याला जीवदान

महाबळेश्‍वर ट्रेकर्सची भूतदया; 80 फूट विहिरीतून कुत्र्याला जीवदान
Updated on: 

महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील भिसे कुटुंबीयांच्या जुन्या 80 फूट खोल अरुंद विहिरीमध्ये मोकाट कुत्रे पडले. या कुत्र्याला महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान व प्राणीमित्रांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. मुख्य बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ व मशीद रस्त्याला जोडणाऱ्या बोळामध्ये भिसे कुटुंबीयांची एक ब्रिटिशकालीन विहीर असून, 80 फूट खोल व अरुंद असलेल्या या विहिरीमध्ये मोकाट कुत्रे पडले.

विहिरीमधून कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आल्याने भिसे कुटुंबीयांनी याबाबतची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनील भाटिया यांना दिल्यानंतर तातडीने महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी दाखल होत मदतकार्यास सुरुवात करण्यात आली. विहीर जुनाट असल्याने खोल विहिरीत उतरणे जिकिरीचे होते. मात्र, महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी खोल विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. ट्रेकर्स टीमचे सनी बावळेकर यांनी दोरखंडाच्या साहाय्याने 80 फूट खोल विहिरीत लीलया उतरून प्राणिमात्रांच्या सहकार्याने या जखमी कुत्र्यास सुखरूप विहिरीबाहेर काढत जीवदान दिले.

उमेदवार असूनही मतदानापासून वंचित; बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले संतापले 

या कुत्र्याची काळजी भाटिया कुटुंबीयांनी घेतली. खाऊ घालून सकाळी सोडून दिले. विहिरीतून कुत्रे बाहेर काढण्याची मोहीम तब्बल तीन तास सुरू होती. मोहिमेत ट्रेकर्सचे जवान व प्राणिमित्र सनी बावळेकर, सुनील भाटिया, प्रवीण जिमन, संदेश भिसे, सचिन गुजर, राजा गुजर, आकाश ढेबे, संदीप सपकाळ, अक्षय माने, रोहित गोळे, सुमित पाटील, सिद्धू ननावरे, संतोष वाडकर, मोहन धनावडे, यश तांबे, शुभम कुंभारदरे आदींनी सहभाग घेतला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators
Sugarcane Agitation
Dhondewadi Ganesh Visarjan Dispute
Marathi News Esakal
www.esakal.com