नगराध्यक्षांच्या पतींमुळेच महाबळेश्‍वरचा विकास खूंटला : अफझल सुतार

अभिजीत खूरासणे
Tuesday, 22 September 2020

लोकांची आर्थिक स्थिती खराब असून, लोकांवर अन्यायकारक लादलेल्या मालमत्ता कराबाबत सवलत देण्याचा निर्णय बैठक घेऊन घेणे गरजेचे होते. मात्र, चर्चेलाच हे तयार नाहीत. रोज आश्वासने देत असून, आजपर्यंत त्यामुळेच हा विषय मार्गी लागला नाही, असे अफजल सुतार यांनी नमूद केले.

महाबळेश्वर (जि. सातारा) : महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने विश्वास ठेऊन आम्हाला निवडून दिले आहे. शहराच्या विकासावर बोलण्यापेक्षा वैयक्तिक टीकेला काहीजण महत्त्व देत आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी मात्र वैयक्तिक पातळीवर टीका करणे चुकीचे असल्याचे मत उपनगराध्यक्ष अफझल सुतार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या वेळी नगरसेवक संदीप साळुंखे, रवींद्र कुंभारदरे, तौफिक पटवेकर, संजय ओंबळे, उमेश रोकडे आदी उपस्थित होते.
 
उपनगराध्यक्ष सुतार म्हणाले,"" महाबळेश्वरला चांगले उच्चशिक्षित नेतृत्व मिळेल, या आशेने जनतेने त्यांना निवडून दिले होते. नगराध्यक्षा या आमच्या बहिणीप्रमाणे आहेत. त्यांच्यावर आम्ही टीका करणार नाही. मात्र, त्यांच्या पतीनेच त्यांना चांगले काम करू दिले नाही. सुरुवातीला जनतेशी असलेली नाळच तोडली. सर्वाना विश्वासात घेऊन काम करणे ही संघाच्या कॅप्टनची जबाबदारी असते. मात्र, बॉल, बॅट माझीच, खेळणार पण मीच, असे असले तर संघ मॅच जिंकेलच कसा?. लोकांनी संधी दिली मात्र या संधीचे सोने करता आले नाही, तर नगराध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे हे "हिटलरशाही'ने पालिकेचा कारभार चालवत आहेत.

कोरेगाव पोलिसांचा फार्म हाऊसवर छापा; पनवेलचे चार अटकेत

पालिकेच्या प्रत्येक गोष्टींमध्ये ते ढवळाढवळ करतात. गेल्या चार वर्षांत विकास झालाच नाही. लोकांना अपेक्षित असे काम होणे गरजेचे होते. विकासाच्या योजनांना आम्ही कधीही विरोध केला नाही. लोकांची आर्थिक स्थिती खराब असून, लोकांवर अन्यायकारक लादलेल्या मालमत्ता कराबाबत सवलत देण्याचा निर्णय बैठक घेऊन घेणे गरजेचे होते. मात्र, चर्चेलाच हे तयार नाहीत. रोज आश्वासने देत असून, आजपर्यंत त्यामुळेच हा विषय मार्गी लागला नाही, असे त्यांनी सांगितले.

Video : पुणे बंगळूर महामार्गावरील सेवा रस्ता खचला
 
ऑनलाइन-ऑफलाइन या एका विषयावरून हा वाद सुरू झाला असून, आम्ही रितसर निवेदन दिले होते. कुणावरही कोणतीही टीकाटिप्पणी केली नव्हती. या महत्त्वपूर्ण विषयाला आमचा विरोधही नव्हता. मात्र, हा विषय वेगळ्या मार्गावर नेला गेला, असे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे सौ चुहे खाकर..बिल्ली चली हज को

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahableshwar Vice President Afzal Sutar Addressed Media Satara News