Pachgani RSP Camp: पाचगणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे ‘सत्यशोधन शिबिर’ संपन्न; महादेव जानकरांचा महागाई, शेतकरी व वंचितांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत महादेव जानकर यांचा संदेश; महागाई, शेतकरी, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार यांसारख्या प्रश्नांवर लढा तीव्र करण्याचा निर्धार
Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy

Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत पक्षाची वाटचाल चालू आहे. धर्म व जातीचे राजकारण करून आर्थिक विषमता संपणार नसून, आगामी काळात वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीची समस्या, स्त्रियांवरील अत्याचार, शिक्षण क्षेत्रातील समस्या आदी विषयांशी संबंधित पक्षाची भूमिका राहणार आहे. स्वाभिमानासाठी कोणत्याही तत्त्वाची तडजोड न करता सत्तेतून आपण बाहेर पडलो आहे, उपेक्षित, वंचित व शोषित सर्व घटकांना न्याय देण्यासाठी लढा चालूच ठेवणार आहे . कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगून पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com