esakal | महाज्योती निबंध स्पर्धेत नागठाणे, फलटण, खंडाळ्यांतील युवा वर्गास यश
sakal

बोलून बातमी शोधा

महाज्योती निबंध स्पर्धेत नागठाणे, फलटण, खंडाळ्यांतील युवा वर्गास यश

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी पुस्कार राशी व प्रशस्तिपत्र देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

महाज्योती निबंध स्पर्धेत नागठाणे, फलटण, खंडाळ्यांतील युवा वर्गास यश

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण या शासननिर्मित संस्थेतर्फे (महाज्योती) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या निबंध स्पर्धेतील सातारा जिल्ह्यात ज्योती साळुंखे (नागठाणे) हिने प्रथम क्रमांक, निकिता भगत (फलटण) हिने द्वितीय क्रमांक, तर वैभव शिवतारे (खंडाळा) याने तृतीय क्रमांक पटकावला.
 
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आणि महिला शिक्षण दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्ह्याचा निबंध स्पर्धेचा निकाल नायगाव येथे महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी जाहीर केला. या वेळी महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, रविभाऊ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Makar Sankranti Festival : सुवासिनींनाे! घरीच वाणवसा घ्या, सीतामाईची यात्रा रद्द

निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार दहा हजार रुपये ज्योती साळुंखे (कला वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे), दुसरा पाच हजार रुपयांचा पुरस्कार निकिता भगत (मुधोजी महाविद्यालय, फलटण), तर तिसरा अडीच हजार रुपयांचा पुरस्कार वैभव शिवतारे (सुशीला शंकरराव गाढवे महाविद्यालय, खंडाळा) यांना प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील उर्वरित 35 जिल्ह्यांतील निकाल हे दहा जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल, असे "महाज्योती'चे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी या वेळी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी पुस्कार राशी व प्रशस्तिपत्र देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

महाकवी महात्मा फुलेंचे कवितांमधून समाजचिंतन

Edited By : Siddharth Latkar

loading image