esakal | दुधेबावीची महालक्ष्मी यात्रा रद्द; पंचायतीच्या बैठकीत ग्रामस्थांचा महत्वपूर्ण निर्णय

बोलून बातमी शोधा

Dudhebavi
दुधेबावीची महालक्ष्मी यात्रा रद्द; पंचायतीच्या बैठकीत ग्रामस्थांचा महत्वपूर्ण निर्णय
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुधेबावी (सातारा) : येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची उद्यापासून होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून दोन दिवस यात्रा होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत कोरोना दक्षता समिती, दुधेबावी यात्रा समितीने ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामदेवतेच्या पूजेचा कार्यक्रम मोजक्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन यात्रा समितीने केले आहे. आदेशाचे पालन न केल्यास संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, सरपंच मधुकर वावरे, उपसरपंच भाऊसाहेब मोरे, महालक्ष्मी यात्रा समिती अध्यक्ष व सदस्य, तसेच ग्रामविकास अधिकारी एस. आर. बोबडे, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कृषी अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

जावलीत कोरोनाचा कहर; तालुक्यात 115 हून अधिक रुग्णांचा बळी, प्रशासनाकडून तत्काळ 'दखल'

Edited By : Balkrishna Madhale