

Satara Set for IT Growth as Cabinet Gives Nod to IT Park Project
sakal
सातारा : युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यात आयटी पार्क व्हावे, यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले आहे. नागेवाडी (ता. सातारा) येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढी शासकीय जमीन आयटी पार्क उभारण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे साताऱ्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.