Maharashtra Farmer Relief: पाच हजारांच्या अग्रीमकडे शेतकऱ्यांचे लक्ष! ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा निकष; तीन लाख ९५ हजार २४० शेतकऱ्यांना लाभाची शक्यता

33 Percent Crop Loss Criteria for Five Thousand Rupees Aid: पाच हजारांच्या मदतीसाठी नुकसानाचा निकष महत्त्वाचा; राज्यातील ३ लाख ९५ हजार शेतकऱ्यांना लाभाची शक्यता
Maharashtra Crop Loss Compensation News Farmers Await Five Thousand Rupees Advance Aid With 33 Percent Damage Eligibility Criteria

Maharashtra Crop Loss Compensation News Farmers Await Five Thousand Rupees Advance Aid With 33 Percent Damage Eligibility Criteria

sakal

Updated on: 

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेल्या अकराही तालुक्यांतील शेतकऱ्यांना शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात मदत दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत थेट बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. यामध्ये निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या तीन लाख ९५ हजार २४० शेतकऱ्यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय महसूल विभाग घेणार आहे. त्यामुळे पाच हजारांच्या अग्रीम मदतीत आपले नाव असणार का, याची उत्सुकता शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com