

Grant Rule Violation: 20 Schools Declared Ineligible for Salary Aid
sakal
-पांडुरंग बर्गे
कोरेगाव: वेळोवेळी झालेल्या मूल्यांकन प्रक्रियेत वारंवार अपात्र ठरलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य शासनाकडून कारवाईचा दणका बसला आहे. शासनाने कोल्हापूर विभागातील ८५ शाळा आणि कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या ४८ तुकड्या वेतन अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित केल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील २० शाळा, तर १६ तुकड्यांचा समावेश आहे.