
सातारा: पाससाठी विद्यार्थ्यांना एसटी डेपोतील पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते. मात्र, महिनाभरापासून अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या विशेष मोहिमेंतर्गत विद्यार्थिनींना एसटी कर्मचाऱ्यांकडून शाळेतच पास दिले जात आहेत. त्यामुळे पाससाठी बस स्थानकावर ताटकळत उभे राहणे बंद झाले असून, या योजनेचा हजारो विद्यार्थिनींना लाभ झाला आहे.