Maharashtra irrigation water charges for farmers
esakal
कराड (सातारा) : शेतीसाठी धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी दहापटीहून अधिक जादा पाणी वापर शुल्क भरावे लागणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एक जुलै २०२६ ते ३० जून २०२९ या कालावधीसाठी ठोक जलशुल्क निर्धारण कार्यवाही सुरू केली (Farmers irrigation water fee hike Maharashtra) आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, मजुरीचे वाढते दर आणि शेतीमालाला मिळणारा अस्थिर भाव या समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांवर या निर्णयामुळे आणखी आर्थिक भार पडणार आहे.