
कऱ्हाड : शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना देखावे सादर करण्यासाठी गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाची मुदत देण्यात येणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी यास मान्यता दिली असून, लवकरच प्रशासनाला याबाबतचे आदेश प्राप्त होतील, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.