OTS Scheme Beneficiary List
esakal
सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (OTS) योजनेसाठी सातारा जिल्ह्यातील ५ हजार ५७८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या (Maharashtra OTS farmer loan waiver scheme 2026) आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५७ गावांमधील या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील तपशील तपासून आपल्या हिश्श्याची रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित बँकेत भरावी, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.