Maharashtra ST Bus: एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! महिलांना १४ सप्टेंबरपर्यंत एनसीएमसीची सक्ती नाही, एसटीने घेतला मोठा निर्णय

MSRTC Relaxes NCMC Rule For Women Until September 14: एनसीएमसी कार्ड वितरणातील अडचणी, सर्व्हरवरीरील ताण आणि सणासुदीचा काळ लक्षात घेऊन एसटी प्रशासनाचा महिलांना १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा दिलासा; सवलतधारकांना मॅन्युअल तिकिटावर प्रवासाची मुभा
Maharashtra ST NCMC Card Rule Gets Relief Women And Senior Citizens Can Travel With Manual Tickets Until September 14

Maharashtra ST NCMC Card Rule Gets Relief Women And Senior Citizens Can Travel With Manual Tickets Until September 14

sakal

Updated on

-रूपेश कदम

दहिवडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना १ सप्टेंबर २०२६ पासून ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, कार्ड वितरणातील अडचणी आणि सणासुदीचे दिवस लक्षात घेता एसटी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाचे दिलासे दिले आहेत. विशेषत: महिलांना १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com