

Public Comfort Boost: Free Sanitation Facilities at ST Bus Stations from June
sakal
सातारा: स्वच्छता अधिभार भरणाऱ्या प्रवाशांना परिवहन महामंडळाकडून आता दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील एसटी स्थानकांतील सर्व स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांसाठी मोफत करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. स्थानक-आगारात दर चार तासांनी स्वच्छता, पाणपोईची स्वच्छता आणि देखभाल, चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमधील सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त एक जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे.