आयुष्यात कितीही अडथळे आले, तरी हार मानू नका; यूपीएससीत बेंदवाडीचा वैभव हिरवेचा झेंडा

बाळकृष्ण मधाळे
Friday, 7 August 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून अभिषेक सराफ हा प्रथम, तर नेहा भोसले दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानुक्रमानुसार हे दोघे आठव्या आणि पंधराव्या स्थानावर आहेत. 2019 च्या यूपीएससी पूर्व व मुख्य परीक्षेत बेंदवाडी (ता. पाटण, जि. सातारा) येथील वैभव हिरवे हा उत्तीर्ण झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये दिल्ली येथे व्यक्तिमत्त्व चाचणी दिली. चार ऑगस्ट 2020 रोजी पात्र झालेल्या 829 उमेदवारांमध्ये 541 वी रॅंक प्राप्त करून सर्वसामान्य कुटुंबातील या मुलाने वयाच्या 22 व्या वर्षी यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातारा : स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला घडवायचं असेल आणि समाजासाठी काही तरी योगदान द्यायचं असेल, तर प्रशासकीय सेवेशिवाय दुसरा कोणाताही पर्याय नाही. नियोजनबद्ध प्रयत्न करून आणि त्याला मेहनतीची जोड देऊन या क्षेत्रात यश मिळवता येतंच. आव्हानात्मक क्षेत्रात यायचं असेल तर मेहनत महत्त्वाची आहे असे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 541 क्रमांक मिळविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दुर्गम अशा बेंदवाडीतील वैभव हिरवे याने नमूद केले.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
 
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो, तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्या मूलभूत अधिकारांसाठी महत्त्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे वैभव हिरवे. वैभवने शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत देशाचे डोळे दिपावेत एवढे यश प्राप्त करणारा त्याच्यासारखा क्वचितच कोणी आढळेल!

ब्रेकिंग : जाणुन घ्या, कोयना धरणातून केव्हा साेडले जाणार पाणी

वैभव हिरवे हा मूळचा बेंदवाडी (ता. पाटण, जि. सातारा) गावचा रहिवासी असून, सध्या कारंडवाडी, महाडिक कॉलनी, सातारा येथे वास्तव्यास आहे. वैभवची आई गृहिणी असून, वडील अनिल तुकाराम हिरवे हे सातारा औद्योगिक वसाहतीमधील खासगी कंपनीत कार्यरत आहेत. वैभवचे प्राथमिक शिक्षण लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी, कोडोली (सातारा) येथे झाले आहे. दहावीत त्याने 96.36 टक्के गुण प्राप्त केले होते. बारावी पर्यंतचे शिक्षण येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे झाले. बारावीतही त्याने 91 टक्के गुण प्राप्त केले. त्यानंतर त्याने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून बी. टेक (मेकॅनिकल) ही पदवी 2018 मध्ये संपादन केली. बी. टेक पूर्ण केल्यानंतर यूपीएससीमध्ये करिअर घडविण्याचे निश्‍चित केले होते. त्यामुळे पुणे येथे थांबून कोणत्याही प्रकारचा क्‍लास न लावता हे यश त्याने निर्विवादपणे प्राप्त केले आहे. वैभवच्या या यशात आई सुमन, वडील, बहीण मनीषा, तसेच पुणे येथील मार्गदर्शक कौस्तुभ व सावळकर यांचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले.

कौशल्याभिमुख शिक्षण देणारी - प्रॅक्टिकल एज्युस्किल्स

आपल्या यशाबद्दल वैभव म्हणाला, ""स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला घडवायचं असेल आणि समाजासाठी काही तरी योगदान द्यायचं असेल, तर प्रशासकीय सेवेशिवाय दुसरा कोणाताही पर्याय नाही. नियोजनबद्ध प्रयत्न करून आणि त्याला मेहनतीची जोड देऊन या क्षेत्रात यश मिळवता येतंच. प्रशासकीय अधिकाऱ्याला वेळ संपली असं सांगता येत नाही, त्यामुळे 24 तास काम करण्यासाठी तयारी हवी. समाजाची सेवा करण्यासाठी आपण ही परीक्षा देत आहोत हे लक्षात ठेवा, तसेच आव्हानात्मक क्षेत्रात यायचं असेल तर मेहनत महत्त्वाची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. मात्र, यामागे खूप कष्टही आहेत. माझ्या मते आयुष्यात कितीही अडथळे आले, तरी हार मानायची नाही, हे ध्येय प्रत्येकांत असणे जरुरीचे आहे, असे मी मानतो.'' 

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती

...तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं कठीण नाही! 

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना फक्त वाचन करून विषयाचे ज्ञान घेणं पुरेसं नाही. शक्‍य असल्यास परिस्थिती समजून घेण्यासाठी एखाद्या भागाला भेट द्या. नियोजनपूर्वक अभ्यास करणं गरजेचं. आव्हानात्मक क्षेत्र असलं तरी नियोजन करून अभ्यास केला, तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं कठीण नाही.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vaibhav Hirwae Bagged 541 Rank In UPSC Exam