
सातारा: दुधाला दरवाढ नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गायींचा सांभाळ करणे कमी केले आहे. ही धोक्याची घंटा ओळखून प्रशासनाने गायीच्या दूध उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापरास प्राधान्य दिले आहे. यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या साह्याने वासरांची निर्मिती करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग महिनाभरात सातारा जिल्ह्यात सुरू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळणार असून, या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे वासराची दूध दरवाढ होत आर्थिक फायदा होणार आहे.