

Alarm Bells Ring as Koyna Water Storage Drops Sharply Amid Delayed Monsoon
sakal
पाटण: पावसाळा लांबल्याने व वळिवाने दडी मारल्याने ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणही आटले आहे. पावसाअभावी कोयनेच्या उपनद्या ही कोरड्या पडल्या आहे. धरणातील जलसाठ्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. धरणात केवळ ९.७८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पावसाची ही स्थिती कायम राहिल्यास राज्यावर १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची स्थिती ओढवण्याची चिन्हे आहेत. कोयनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातून केवळ १६० मेगावॅट वीजनिर्मिती होत असून, एक हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा चौथा टप्पा पूर्णपणे बंद आहे.