
राजाळे : बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालगंधर्व रंगमंदिराचा ५६ वा वर्धापनदिन सोहळा नुकताच झाला. यावेळी फलटणचे प्रसिद्ध ड्रम पॅड वादक ओंकार हरिदास साळुंखे यांना बालगंधर्व पुरस्कार अभिनेत्री दीपाली सय्यद व चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते देण्यात आला.