पदवीधरच्या निकालावर पुढील निर्णय अवलंबून : पृथ्वीराज चव्हाण

रुपेश कदम
Monday, 30 November 2020

महाविकास आघाडीचे मतदार जास्त आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान होणे हे अत्यंत आवश्‍यक आहे. मतदान बाद होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.

दहिवडी (जि. सातारा) : ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांना विजयी करण्यापुरती मर्यादित नसून ही निवडणूक विचारधारेची लढाई आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रा. जयंत आसगावकर व अरुण लाड या उमेदवारांच्या प्रचारार्थ डॉ. संदीप पोळ यांच्या निवासस्थानी आयोजिलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

या वेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, ऍड. उदयसिंह पाटील, डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, सुनील पोळ, तानाजी कट्टे, मामूशेठ वीरकर, युवराज सूर्यवंशी, बबन वीरकर, बाळासाहेब माने, सुभाष नरळे, श्रीराम पाटील, बाळासाहेब सावंत, एम. के. भोसले, विष्णुपंत अवघडे, प्रशांत वीरकर, श्रीकांत जगदाळे, बाळासाहेब काळे, विजय धट आदी उपस्थित होते.
 
श्री. चव्हाण म्हणाले, ""महाविकास आघाडी सरकारची ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीच्या निकालावर पुढील निर्णय अवलंबून आहेत. या मतदारसंघात आपले मतदान जास्त आहे. त्यामुळे उमेदवार निवडून येण्यात कसलीच अडचण नाही.'' सतेज पाटील म्हणाले, ""महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आणणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. आपले हक्काचे मतदान वाया जाता कामा नये. कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत.'' प्रभाकर देशमुख म्हणाले, ""या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी असते. महाविकास आघाडीचे मतदार जास्त आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान होणे हे अत्यंत आवश्‍यक आहे. मतदान बाद होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.''

बहुजनांच्या संस्थांवर टाच आणण्याचा प्रयत्न भाजपने केला : डाॅ. सुरेश जाधव

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi Meeting For Pune Graduate Constituency In Dhaiwadi Satara News