
बावधन : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. वाई येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, अनिल जगताप, नीलेश डेरे, दिलीप बाबर, डॉ. नितीन सावंत, विजयसिंह पिसाळ, समाधान कदम, संग्राम कदम उपस्थित होते.