esakal | महाविकास आघाडीचा बंद अन्यायकारक : विक्रम पावसकर | Satara
sakal

बोलून बातमी शोधा

satara

महाविकास आघाडीचा बंद अन्यायकारक : विक्रम पावसकर

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : माहविकास आघाडीने उद्या (सामोवरी) पुकारलेला बंद म्हणजे केवळ राजकीय सुंदोपसुंदी आहे. सामान्य जनतेला नाहक वेटीस धरले जात आहे. त्यामुळे त्या बंद मध्ये कोणीही सहभागी होवू नये, असे आवाहन बाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले.

ते म्हणाले, दीड वर्षापासून कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी , उद्योग वर्ग मेटाकुटीस आला आहे आर्थिक घडी विस्कटली आहे, ती पूर्ववत होण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो, अनेक व्यावसायिक व्यापाऱ्यांची कर्जे भागवणे अशक्य झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, अशा स्थितीत सुंदोपसुंदीच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक वेठीस धरून पुकारलेला बंद हा चिंताजनक आहे ,त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बंद ठेवायला लावणे,जबरदस्ती करणे हे चुकीचे आहे ,कायद्याला धरून नाही.

कोरोनाची लाट कमी होताना दिसते आहे जनजीवन व आर्थिक व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे, प्रत्येक दिवस हा कमाईच्या दृष्टीने सर्वसामान्य जनता ,व्यापारी, छोटे,मोठे व्यवसायिक यांना महत्त्वाचा आहे या स्थितीत उद्या (ता. ११) महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद सर्वांसाठी अन्यायकारक व नुकसानदायी आहे, बंद पुकारण्याच्या आधी संबंधितांनी या सर्व वस्तुस्थितीचा विचार केलेला नाही तसेच त्यांना सर्वसामान्य जनतेच्या होणाऱ्या नुकसानीशी आणि दुःखाशी काहीही घेणेदेणे दिसत नाही.

loading image
go to top