esakal | आपल्या दोन हातात लाखो घरांना प्रकाशमय करण्याची ताकद आहे बेटा; बाबांचे हे शब्द आठवल्यानंतर मन शांत हाेत
sakal

बोलून बातमी शोधा

Fathers day

आपल्या दोन हातात लाखो घरांना प्रकाशमय करण्याची ताकद आहे, बेटा!

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : आई आणि वडील यांच्याविषयी कितीही बोलले तरी कमीच आहे. दोघेही आपल्या मुलांच्या संगोपनासाठी, त्याचे भविष्य घडविण्यासाठी अहोरात्र झटत असतात. या दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात मदर्स डे (mothers day) आणि फादर्स डे (fathers day) हे डे ज साजरे केले जातात. जून महिन्याचा तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्त राज्य विद्युत मंडाळातील (mahavitran) एक कर्मचा-याच्या मुलीने तिच्या बाबांना पत्र लिहिले आहे. खरं तर तिने तिच्या पत्रातून विद्युत मंडळाच्या कर्मचा-यांची कुटुंबियांची भावना मांडल्याचे प्रत्यय ते पत्र वाचल्यावर आपल्या सर्वांना येतो. (mahavitran-employee-child-writes-letter-fathers-day-2021-trending-news)

हे जीवन सुंदर आहे आणि ते सुंदरतेने जगण्यासाठी बाबांनी त्यांच्या विचारांची चौकट निर्माण केली आहे. त्याप्रमाणेच ते कर्तव्य बजावत आयुष्य जगत आले आहेत. प्रत्येक जण कोणाची तरी प्रेरणा घेऊन पुढं जात असते. बाबांकडून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आणि त्यांचे आदर्श अनुसरूनच आम्ही जीवनात मार्गक्रमण करीत आहाेत असेच त्या कर्मचा-याची मूलगी सांगत आहे.

विद्युत मंडळाच्या कर्मचा-याची मूलगी लिहते प्रिय बाबा,

विजेच्या तारा जोडताना आणि नात्यांचे तारा जपताना तुमची तारेवरची कसरत होत असेल ना. मला आठवतय चिंटूच्या पाचव्या वाढदिवसाला, माझ्या शाळेच्या स्पोर्टस डे ला आणि तुमच्या स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही घरी नव्हता. पण आज या मला गोष्टींची खंत नाही तर अभिमान आहे. कारण इतर लोकांना निश्‍चिंतपणे आनंद साजरा करता यावा यासाठी तुम्ही कर्तव्य बजावत होता. रणरणतं उन असो की मुसळधार पाऊस. तुम्ही कूठल्याही परिस्थितीत निस्वार्थीपणे काम करीत असता. बाबा, आम्हांला अंधाराची अजिबात भिती वाटत नाही, तुमच्यामुळे. कारण आम्हांला खात्री आहे आयुष्यात कितीही अंधार असला तरीही तुम्ही त्या अंधारात आशेची एक ज्योत पेटवायला कायम असला.

तुम्ही जेव्ही आपल्या जीवावर उदार होऊन काम करीत असता ना तेव्हा आमच्या मनात भीतीने काहूर माजलेला असतो. पण मग तुमचे शब्द आठवतात. आपल्या दोन हाता लाखो घरांना प्रकाशमय करण्याची ताकद आहे, बेटा. आणि मग मन शांत होतं. बाबा शहरातील सर्व घरांमध्ये आणि
आमच्या जीवनांमध्ये उर्जा पूरविल्याबाबत धन्यवाद.हॅपी फादर्स डे, बाबा.

loading image
go to top