

Shambhuraj Desai
sakal
सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरली आहे. आमचे पहिले प्राधान्य महायुतीला असेल. आजपर्यंत आम्ही महायुतीतील दोन्ही पक्षांचा सन्मान राखला आहे. आता त्यांनी या निवडणुकीत आमचा सन्मान राखावा; पण जागा वाटपात आम्हाला योग्य वाटा मिळणार नसेल, तर आमच्यापुढे इतर पर्याय खुले असतील, असा सूचक इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.