
पांडुरंग बर्गे
कोरेगाव : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक महाविकास आघाडी व महायुती समोरासमोर एकसंधपणे लढणार की आघाडी व महायुतीमधील प्रमुख सहा पक्ष स्वतंत्ररीत्या लढणार यावर या निवडणुकीचे यशापयश अवलंबून राहण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत प्रमुख चार पक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते, तर या निवडणुकीत प्रमुख सहा पक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तालुक्याचा राजकीय इतिहास पाहता याठिकाणी कॉँग्रेस आणि अधिकतर राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. मात्र, बदलत्या स्थितीत शिवसेनेनेही मुसंडी मारल्याने त्यांच्याकडून येथील इतिहास पुसला जाणार का, याची उत्सुकता आहे.