Satara Politics: सातारा सभापतीपदी महेश गाडे; भाजपकडेच सत्तासूत्रे, उपसभापतिपदी सुषमा जाधव, शिवसेनेचे मत राष्ट्रवादीच्या पारड्यात!

Shiv Sena supports NCP in Satara local elections: सातारा पंचायत समितीत भाजपचा विजय; महेश गाडे सभापती, सुषमा जाधव उपसभापती
Satara Politics Update: Mahesh Gade Chairman, Sushma Jadhav Vice Chairperson, Shiv Sena Backs NCP

Satara Politics Update: Mahesh Gade Chairman, Sushma Jadhav Vice Chairperson, Shiv Sena Backs NCP

sakal

Updated on

सातारा : सातारा पंचायत समितीच्या सत्तासमीकरणात कोंडवे गणातील भाजपचे महेश गाडे यांची सभापतिपदी, तर अतीत गणातील सुषमा जाधव यांची उपसभापतिपदी निवड झाल्याने पंचायत समितीतील सत्तेची सूत्रे भाजपने ताब्यात ठेवली. विरोधी गटातून सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे राहुल कापले व उपसभापतिपदासाठी स्वप्नाली फडतरे यांनी अर्ज भरला होता. त्यांना अनुक्रमे सहा मते मिळाली. भाजपकडून महेश गाडे व सुषमा जाधव यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांचा अपेक्षेप्रमाणे हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर दहा मते मिळवीत विजय मिळविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com