
भोसे : महू जलाशय मे महिन्यापासूनच्या संततधार पावसाने यंदा लवकर भरला आहे. जुलैमध्येच महू धरणाच्या सांडव्यावरून कुडाळी नदीपात्रात १८७ क्युसेकचा विसर्ग सुरू झाला आहे. संततधार पावसामुळे विसर्ग अचानक वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.