
सातारा : संगममाहुली परिसरातील वेण्णा-कृष्णा घाटाचा पूर्णतः जीर्णोद्धार करावा, असा प्रस्ताव बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता देत संबंधित खात्याला पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.