

MD Drug Seizure in Karad: Three Accused Nabbed, Luxury Assets Confiscated
sakal
कऱ्हाड: एमडी ड्रग्ज विक्रीस आणणाऱ्या तिघांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. येथील वारुंजी फाट्यावरील उड्डाण पुलाखाली पाटण तिकाटणे परिसरात दुपारी दीडच्या सुमारास कारवाई झाली. त्यात पावणेतीन लाखांचे सुमारे ९५.७८ ग्रॅमचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. एक कार, तीन मोबाईल संच असा सुमारे २५ लाखांचा अन्य ऐवजही कारवाईत जप्त केला आहे.