Satara Crime: फरारी संशयितास पळशीत अटक; म्हसवड पोलिसांची कारवाई, चार वर्षांपासून देत होता गुंगारा
गुन्ह्याचा तपास पूर्ण करून त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते; परंतु न्यायालयात या गुन्ह्याच्या सुनावणी करता रोहिदास जाधव गेल्या चार वर्षांपासून हजर राहात नव्हता, त्यामुळे त्यास अजामीनपात्र नॉन बेलेबल अटक वॉरंट न्यायालयाने काढले होते.
On the Run for 4 Years: Fugitive Caught in Dramatic Police ActionSakal
म्हसवड : मारहाण, जबरी चोरी करून गेल्या चार वर्षांपासून न्यायालयात हजर न राहणाऱ्या रोहिदास शिवाजी जाधव या फरारी संशयितास म्हसवड पोलिसांनी पळशी (ता. माण) येथे शिताफीने अटक केली.