
Congress, BJP, and NCP leaders raise objections in Wai over serious mistakes in the draft voter list; demand immediate correction.
Sakal
वाई : येथील नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे काँग्रेस पक्षाने निदर्शनास आणले आहे. प्रभाग क्रमांक सातमधील मतदार यादीत सुमारे १६० ते १९० मतदारांची नावे चुकीने समाविष्ट करण्यात आली असून, ही नावे प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक आठमध्ये येतात, असा काँग्रेस पक्षाचा आरोप आहे.