

Satara Police Retrieve Missing Phones Valued at Over ₹9.6 Lakh
Sakal
सातारा: शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे नऊ लाख ६० हजार रुपये किमतीचे ५३ मोबाईल हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. नागरिकांचे हरविलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला सूचना दिल्या होत्या.