
वाई : येथील गंगापुरीत असलेल्या सृष्टी अपार्टमेंटमधील दोन बंद सदनिकांच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे १९ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मध्यवस्तीत भरदिवसा ही घरफोडी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.