
वाई : सुरूर- शहाबाग (वाई) रस्त्यालगत असलेली दीडशे वर्षांपूर्वीपासूनची झाडे वाईचे सौंदर्य आणि वैभव आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात एकाही झाडाला हात लावू नये. झाडे भराव करून सुरक्षित करावीत. स्थानिक व पर्यटकांच्या वाहनांना अडथळा होणार नाही, असे नियोजन करून टप्प्याटप्प्याने मॉन्सूनपूर्वी भराव व काँक्रिटीकरण पूर्ण करावे. यामध्ये ठेकेदार अथवा अधिकारी यांच्याकडून हलगर्जीपणा झाल्यास कोणाचीही गाय केली जाणार नाही, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.