कोरोनामुक्तीसाठी मलकापूर सरसावले, 24x7 जन आरोग्य तपासणी अभियान हाती

Satara
Satara
Updated on

मलकापूर (जि. सातारा) : कोरोनामुक्त मलकापूरसाठी येथील पालिकेने 24x7 जन आरोग्य तपासणी अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्व्हे करणे, स्वच्छता ठेवणे, शहर सॅनिटायझेशन करणे, फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करणे आदी कामे हाती घेतली आहेत. 

मलकापूरमध्ये आगाशिवनगर, अहिल्यानगर व विश्रामनगर या भागामध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रादुर्भाव झाल्यामुळे शहरामध्ये कोरोना विषाणू बाधितांची संख्या 30 इतकी झाली होती; परंतु पालिकेने सर्वांच्या सहकार्याने मलकापूर शहर कोरोनामुक्त करणेसाठी कठोर परिश्रम घेऊन 26 मे 2020 पासून शहर कोरोनामुक्त ठेवले आहे. यापुढेही शहर कोरोनामुक्त राहावे, याकरिता पालिकेने 24x7 जन आरोग्य तपासणी अभियान हाती घेतले असून, या अभियानाचा प्रारंभ तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या उपस्थितीत झाला. 

पालिकेने भारती विद्यापीठ व आगाशिवनगर येथे जिल्हा परिषद कॉलनी येथे दररोज सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत ओपीडी सुरू केली असून, या माध्यमातून लोकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यापुढे जाऊन पालिकेने दिल्ली सरकारने सुरू केलेले मोहल्ला क्‍लिनिकप्रमाणे प्रभाग क्‍लिनिक सुरू करण्याची संकल्पना हाती घेतलेली आहे. 

शहरातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षांखालील लहान मुले यांना आहारतज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार असून, पात्र शेतमजूर, कामगार व मोलमजुरी करणाच्या महिला यांना पोष्टिक आहार व औषधे प्रभाग समितीच्या माध्यमातून, लोकसहभाग घेऊन व पालिकेमार्फत पुरविली जाणार आहेत व त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करणेत येणार आहे. 


""24x7 जन आरोग्य तपासणी अभियान राबवून मलकापूर शहर कोरोना मुक्त ठेवण्याचा मनोदय आहे. त्याद्वारे नागरिकांच्या आरोग्याचा सर्व्हे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.'' 
- मनोहर शिंदे 
उपनगराध्यक्ष, मलकापूर 


""मलकापूरने सुरू केलेले अभियान अत्यंत स्तुत्य असून, मायक्रोप्लॅनिंग कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणणे मलकापूर नगरपंचायत होय. यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होत आहे.'' 
- बी. आर. पाटील, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक 


""मलकापूरमध्ये हाती घेतलेल्या सर्व योजनांचे मायक्रो नियोजन असल्यामुळे त्याचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे.'' 

- अमरदीप वाकडे 
तहसीलदार, कऱ्हाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com