esakal | जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना स्पष्ट आदेश

बोलून बातमी शोधा

Malkhed Check
जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना स्पष्ट आदेश
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील मालखेड चेकपोस्टला भेट देवून पाहणी केली. जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मालखेड चेकपोस्टवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी मंत्री देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील चेकपोस्टची पाहणी केली. त्यानंतर गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, राज्यात जिल्ह्याच्या नाकाबंदीची पोलिस खात्याची तयारी पूर्ण झाली आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून पोलिस दल अलर्ट आहे. राज्यात जिल्हा वाहतुकीची बंदी लागू करण्यात असल्याने वैद्यकीय, दुःखद घटनेचे किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्याची हद्द सोडता येणार नाही. पोलिसांची नाकाबंदी चांगल्या पध्दतीने सुरु आहे. आता प्रवास करणे टाळले पाहिजे. फारच गरज असेल तर परवानगी घेवून प्रवास करावा. पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत. जनतेचा संपर्क आल्यामुळे पोलिस बाधित होत आहेत. त्यांच्या प्रकृतीची काळजी जनतेनेच घेतली पाहिजे.  

लॉकडाउनमुळे ट्रॅव्हल्सची चाके जाग्यावरच; प्रशासनाची पर्यटनावरही बंदी

शेणोली, मालखेडच्या सीमाबंद

सातारा व सांगली जिल्ह्याच्या मालखेड, शेणोली, सोनसळ घाट येथे सीमा पोलिसांनी काल रात्री सील केल्या. जिल्हा बंदीच्या कारवाईपोटी मालखेड, शेणोली व सोनसळ घाट येथे कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे व मुंबईवरून येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. 

Edited By : Balkrishna Madhale