
कातरखटाव : दुचाकी वाहनाला झालेल्या अपघाताच्या व नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून चारचाकी वाहन चालकास झालेल्या मारहाणीत वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बनपुरी (ता. खटाव) येथे घडली. संजय पांडुरंग कर्चे (वय ५५, रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे मृत वाहनचालकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.