Man-Khatav Assembly Election
Man-Khatav Assembly Election Sakal

Man-Khatav Assembly Election 2024 : माण-खटाव विधानसभा मतदारसंघ : जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर घार्गे

Man-Khatav Vidhansabha Election 2024माण-खटाव विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाने प्रभाकर घार्गे यांना तर महायुतीने जयकुमार गाेरे यांनी उमेदवारी दिली होती. या दोघांत मोठी चुरस पहायला मिळाली.
Published on

२०१९ मध्ये भाजपाकडून निवडणूक लढवताना माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या विरोधात फक्त २९५५ मतांची आघाडी मिळवत पराभवाची नामुष्की गोरेंनी टाळली होती.

लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी मतदारसंघातून नाईक निंबाळकर यांना २३ हजार ३६५ मतांची आघाडी मिळवून देण्यात गोरे यशस्वी ठरले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्धींनी शड्डू ठोकला असून त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात भाजप, शिवसेना, रासप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पक्षाच्या विरोधात भूमिका ठेवण्याचा निर्णय घेत, यातून एक उमेदवार उभा करुन तो निवडून आणायचा असा ठराव केला.

किंगमेकर माजी आमदार कै. सदाशिवराव पोळ यांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या माण मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांनी आपली पकड मजबूत केली होती. २००९ अपक्ष, २०१४ काँग्रेस तर २०१९ भाजप अशा तीन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवून जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. यावेळी मात्र त्यांच्या चिन्हात बदल झाला नसून सलग दुसऱ्यांदा ते भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com