
घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदेगट) डॉ. हिकमत उढाण यांनी 98 हजार 496 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री तथा विद्यामान आमदार राजेश टोपे यांनी 96 हजार 187 मते घेऊन द्वितीय क्रमांकावर राहिले. तर अपक्ष सतीश घाटगे यांनी 23 हजार 696 मते घेत तिसर्या क्रमांकावर राहिले. यामुळे घनसावंगीत राजेश टोपे यांचा सहाव्यांदा होणारा विजयरथ 2309 मतांनी रोखून डॉ. उढाण यांनी यश मिळवले.