Life imprisonment : बापानेच पोटच्या लेकाला टॉनिकच्या बाटलीतून पाजले विष; अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Satara News : रणजित बुलुंगे याला दोन महिने १९ दिवसांचा मुलगा (वेदांत) होता. तो मुलगा दत्तक देण्याबाबत त्याने पत्नीच्या माहेरीकडील लोकांशी चर्चा केली; परंतु त्यांनी वेदांतला दत्तक देण्यास विरोध केला.
"Father sentenced to life imprisonment for poisoning his son with a tonic bottle in a shocking family crime."Sakal
वडूज : स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलाला विष पाजून हत्या केल्याप्रकरणी वडूज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रणजित सुरेश बुलुंगे (वय ३३, सुरूर, ता. वाई) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.