Satara Crime : 'मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक'; दहिवडी पोलिसांची कारवाई, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मंदिराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या कासवाजवळ इतर भाविकांच्या सोबत गर्दीमध्ये दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे २१.७५ ग्रॅम वजनाचे एक लाख ७७ हजार ३०० रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र कुणीतरी चोरले असल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली होती.
Satara Crime
Satara Crime Sakal
Updated on: 

दहिवडी : माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचे पावणेदोन लाख रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस ऐवजासह चोवीस तासांत दहिवडी पोलिसांनी अटक केली. दीपाली महेश शेंडगे (वय २८, रा. साठेनगर आश्रमशाळेजवळ इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...