'मानवाधिकार'च्या जिल्हाध्यक्षपदी बिदालच्या मनीषा राऊत; सांगली शाखेची मोठी जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

सांगली जिल्हा महिला अध्यक्षपदी मनीषा राजेंद्र राऊत यांची निवड करण्यात आली. मूळच्या बिदाल (ता. माण) येथील रहिवाशी व राजापूर (ता. खटाव) हे माहेर असलेल्या मनीषा राऊत यांना सामाजिक कार्याची आवड असून गेली सात वर्षे त्या सामाजिक कल्याणासाठी झटत आहेत.

सातारा : सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या सांगली महिला जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी मनीषा राऊत यांची निवड झाली. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सार्वभौमिक मानवाधिकार परिषद महत्त्वाचे कार्य करत आहे. जनतेला त्यांचे न्याय व हक्क बजावता यावेत, महिलांवरील अत्याचार रोखले जावेत, यासाठी ही संघटना कार्यरत आहे. 

या परिषदेच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षपदी मनीषा राजेंद्र राऊत यांची निवड करण्यात आली. मूळच्या बिदाल (ता. माण) येथील रहिवाशी व राजापूर (ता. खटाव) हे माहेर असलेल्या मनीषा राऊत यांना सामाजिक कार्याची आवड असून गेली सात वर्षे त्या सामाजिक कल्याणासाठी झटत आहेत. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात. 

गडकरी साहेब, महाराष्ट्रातील एनएचएआयच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना घरी पाठवा 

अवयवदान जनजागृती चळवळीतही त्यांचे सक्रिय योगदान आहे. महिलांवरील अत्याचार व अन्यायाविरुद्ध संघटनेच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे निवडीनंतर त्यांनी स्पष्ट केले. राऊत यांची सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manisha Raut District President Of The Human Rights Council Satara News