माणदेशी फाउंडेशन गोंदवल्यात उभारणार कोविड हॉस्पिटल

माणदेशी फाउंडेशन गोंदवल्यात उभारणार कोविड हॉस्पिटल

मायणी (जि. सातारा) : सध्याच्या कोविड साथीत म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना वेळोवेळी सर्वाधिक सुमारे एक कोटी 80 लाख रुपये किमतीच्या वैद्यकीय साधनांची मदत केली आहे. मायणी कोविड हॉस्पिटलसाठी ऑक्‍सिजनचे 50 जम्बो सिलिंडर दिल्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले. 

येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ऍन्ड रिसर्च सेंटरमधील कोविड हॉस्पिटलसाठी माणदेशी फाउंडेशनने मोफत दिलेल्या जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडरच्या निमित्ताने माणदेशी फाउंडेशनचे आभार कार्यक्रमात आमदार गोरे बोलत होते. यावेळी माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ऍन्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष एम. आर. देशमुख, संचालिका शैलजा साळुंखे, कोविड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सागर खाडे, प्राचार्य डॉ. आनंदराव आरबुने, नोडल अधिकारी डॉ. सचिन चव्हाण आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

नांदेडकरांना दिलासा : कोरोना बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूदरात घट 
 
आमदार गोरे म्हणाले, ""कोरोनाच्या साथीचे रुग्ण वाढू लागताच आम्ही शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता मायणी येथे प्रथम स्वतंत्र 50 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले. त्यानंतर पुन्हा आवश्‍यक्तेनुसार बेडची संख्या वाढवत आज 85 केली आहे. उपचारासाठी रुग्णांना ऑक्‍सिजनची नितांत गरज भासत होती. परंतु, त्यासाठी आवश्‍यक असणारे ऑक्‍सिजनचे जम्बो सिलिंडर पुरेशा संख्येने उपलब्ध होत नव्हते. "माणदेशी'च्या अध्यक्षा चेतना सिन्हा, प्रभात सिन्हा यांच्यासमोर ही समस्या मांडताच त्यांनी तातडीने 50 जम्बो सिलिंडर देण्याचे मान्य केले. त्यापैकी आज 30 सिलिंडर हॉस्पिटलमध्ये पोच केले आहेत. "माणदेशी'ने तातडीने सिलिंडरची मदत केल्यामुळे याचा फायदा निश्‍चितच कोविड रुग्णांना होईल व त्यांचे प्राणही वाचतील.''

कऱ्हाड पोलिसांच्या मर्यादा स्पष्ट; खबऱ्यांचे जाळेही विस्कळित

मायणीच्या कोविड हॉस्पिटलमध्ये सुमारे 500 हून अधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचारात रुग्ण मृत्यूची संख्याही नगण्यच आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णालयातील डॉक्‍टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे राहिल्यामुळे हे शक्‍य झाले. कोविड रुग्णांसाठी सरकारकडून अद्यापही एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याचा खुलासाही श्री. गोरे यांनी केला. 

प्रभात सिन्हा म्हणाले, ""कोरोना साथीचे संकट येताच माणदेशी फाउंडेशनने इतर लोकोपयोगी उपक्रमांपेक्षा कोविड साथीवर उपाययोजनेवरच लक्ष केंद्रित केले. पुणे, सातारा, म्हसवड येथील कोविड हॉस्पिटलसाठी भरीव अशी मदत केलेली आहे. मायणी हॉस्पिटलसाठी 30 जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर दिले आहेत व आणखी दोन व्हेन्टिलेटर बेड देत आहोत. यापुढेही आणखी निश्‍चितच मदत केली जाईल.

साता-याच्या कोविड हॉस्पिटलला माणदेशीची 70 लाखांची मदत

गोंदवले येथे माणदेशी फाउंडेशनने 50 लाख रुपये खर्च करून कोविड हॉस्पिटल उभारत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व वैद्यकीय साधनांनीयुक्त हे कोविड हॉस्पिटल असणार असून माण-खटावमधील कोविड रुग्णांस मोफत उपचार उपलब्ध होतील.'' आर. एम. देशमुख यांनीही माणदेशी फाउंडेशनने जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर तातडीने दिल्याबद्दल व आणखी दोन व्हेन्टिलेटर बेड देण्याचे योगदान देणार असल्यामुळे माणदेशीचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com