साता-याच्या कोविड हॉस्पिटलला माणदेशीची 70 लाखांची मदत

साता-याच्या कोविड हॉस्पिटलला माणदेशीची 70 लाखांची मदत

म्हसवड (जि. सातारा)  : कोरोनासाथीच्या कालावधीत गावोगावचे नागरिक आणि शासकीय आरोग्य विभागास माणदेशी फाउंडेशनने तब्बल दोन कोटी 82 लाख रुपयांची शासनाच्या विविध उपक्रमात भाग घेऊन मदत केली असून, सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इमारतीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटललाही भरीव अशी 70 लाखांची मोलाची अशी मदत केली आहे. यापुढेही मदत केली करणार असल्याची माहिती माणदेशी फाउंडेशच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा व माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी दिली. 

श्रीमती सिन्हा म्हणाल्या, ""माण-खटाव तालुक्‍यातही कोविड रुग्ण वाढत आहेत. दहिवडी येथेही 500 हून अधिक कोरोना रुग्णांची संख्या झालेली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी माण तालुक्‍यात मध्यवर्ती असलेल्या गोंदवले खुर्द येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आवश्‍यक असलेली साधने ऑक्‍सिजन पाइपलाइन, फोर एचएफएनओ, नर्सेस, पीपीई किट, एक्‍स-रे मशिन, सॅनिटायझर, ऑक्‍सिजन सिलिंडर आदी सुमारे 50 लाख रुपये खर्चाच्या सुविधा "माणदेशी'च्या माध्यमाने उपलब्ध करून देत आहोत. मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरसाठी "माणदेशी'ने ऑक्‍सिजन सिलिंडर मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतलेला आहे.''

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जेवणाशी केली मैत्री : दत्तात्रय बारसवडे 

कोरोनाच्या साथीच्या कालावधीत सर्वांत महत्त्वाचे असते म्हणजे, धैर्य, घरच्यांचे प्रेम आणि सकस पोषण आहार. लॉकडाउनच्या कालावधीत राज्यात व देशातील सर्व शहरे, गावे कडकडीत बंद होती. प्रवासी वाहतूकही ठप्प होती. मजूर आणि कामगारांना जेवणाची गैरसोय होत असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येताच माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक, चिपळूण, दोपोली, लातूर इत्यादी गावी सुमारे 15 हजार गरीब लोकांना ताजे जेवण नियमित देण्याचाही उपक्रम राबविला असून, या उपक्रमाने लॉकडाउन कालावधीत सर्वच बंद असल्यामुळे भुकेने व्याकुळ झालेल्या नागरिकांना पोटभर ताज्या जेवणाची सुविधा झाली.

चुकीला माफी नाही, राजेंद्र यादवांची नगराध्यक्षा शिंदेंवर कडाडून टीका 

म्हसवड व दहिवडी येथी क्‍वारंटाइन सेंटरमध्ये माण तालुक्‍यातील गावोगावचे कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी ठेवले जात असून, या रुग्णांसाठी रोज प्रत्येकी एक मोसंबी, केळी, दोन उकडलेली अंडी व अडीचशे ग्रॅम खजूर असा पोषक आहार सलग आठ दिवस देण्याचा उपक्रम माणदेशीने सुरू केलेला आहे. म्हसवड शहरातील संशयित कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यासाठी दोन हजार किट, येथील डॉक्‍टर, आरोग्य सेविकांसाठी पीपीई किट, सॅनिटायझर मोफत दिले आहे. जिह्यातील सर्व शासकीय कार्यालयांस मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत राबविण्यात आला आहे. 

लॉकडाउन कालावधीत रोजगार उपलब्ध नसलेल्या महिला बचत गटांसह गावेगावच्या इतर महिलांनाही सुमारे पाच लाखांहून अधिक संख्येने मास्क शिलाईच्या रोजगाराची संधी "माणदेशी'च्या माध्यमाने उपलब्ध करून देण्यात आली असून, हा उपक्रम अद्यापही सुरू आहे. माणदेशी फाउंडेशनने लॉकडाउन कालावधीत कोरोनाच्या साथीमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंपासून ते रुग्णालयापर्यंत सर्व काही वेळीच मदत केलेली आहे व सध्याही मदतकार्य सुरूच आहे. या उपक्रमास माणदेशी फाउंडेशनसाठी आर्थिक योगदान देत असलेल्या एचएसबीसी बॅंक, सिप्ला फाउंडेशन आणि इंडसइन बॅंकेचे माणदेशी फाउंडेशन सातारावासीयांकडून आभारी असल्याचे श्रीमती सिन्हा व श्री. सिन्हा यांनी सांगितले. 

साता-याची चौपाटी अजूनही लॉक!

लॉकडाउन कालावधीत सातारा जिह्यासह राज्यातील इतर जिह्यांतही बेरोजगार व गरीब कुटुंबांना 20 हजारांहून अधिक संख्येने धान्य, डाळी, साखर, साबण, गोडेतेल, चटणी, मसाला इत्यादी जीवनावश्‍यक वस्तूंसह मास्क व सॅनिटायझर, शरीरात ऍन्टीबॉडीची वाढ करणाऱ्या गोळ्या व औषधांचा समावेश असलेल्या किटचे घरपोच वाटप करून मदत केल्याची माहिती माणदेशी महिला बॅंकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी यावेळी दिली. 

आम्ही तुमच्या परिवारासारखे तुमच्याबरोबर... 

सातारा जिल्ह्यासह माण-खटाव तालुक्‍यांतील बंधू-भगिनींनो आज आपण सर्वच जण मोठ्या संकटातून जात आहोत. या संकटात आम्ही तुमच्या परिवारासारखे तुमच्याबरोबर आहोत. जेवढे काही शक्‍य आहे, ते आम्ही नक्की करूच. आपण विश्रांती घ्यावी, चांगल्या आहाराचे सेवन करावे आणि लवकर बरे होऊन घरी जावे, अशा सदिच्छा माणदेशीच्या वतीने श्रीमती सिन्हा व श्री. सिन्हा यांनी शेवटी दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com