
सातारा: आझाद मैदानावरील मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता मंगळवारी सायंकाळी उपसमिती प्रमुखांच्या उपस्थितीत झाली. उपोषणादरम्यान मागण्यांबाबतच्या राजपत्राचा मसुदा जरांगे-पाटील यांना दिल्यानंतर त्याठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी त्यांनी सातारा गॅझेटियरच्या मुद्द्यावर चर्चा केली. चर्चेदरम्यान ते गॅझेटियर लागू करण्याची जबाबदारी माझी असल्याचा शब्द शिवेंद्रसिंहराजे यांनी जरांगे-पाटील यांना दिला. यानंतर जरांगे-पाटील यांनी राजेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतोय, असे म्हणत शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.