पोलिस घेईनात मोटारी चोरीची तक्रार; शेतकरी हतबल

Crime
CrimeSakal
Updated on
Summary

पोलिस शेतकऱ्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत. सहा महिन्यांपासून विहीर, कालव्यावरील विद्युत मोटर चोरीचे सत्र सुरूच आहे.

मसूर (सातारा): निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच पाऊस काळ कमी असल्याने दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कोरोना महामारीचे संकट आहे. या कात्रीत सापडलेल्या विभागातील शेतकऱ्यांच्या आरफळ कालव्यावर बसवण्यात आलेल्या अनेक विजेच्या मोटारी चोरीला गेल्या आहेत. मात्र, पोलिस शेतकऱ्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत. सहा महिन्यांपासून विहीर, कालव्यावरील विद्युत मोटर चोरीचे सत्र सुरूच आहे.

Crime
कोल्हापुरात तूर, मसूर, उडीद डाळ साठ्यावर निर्बंध

मार्चपासून विभागात विजेच्या मोटारी चोरीचे सत्र सुरू आहे. त्याचा फटका विभागातील मसूरसह कालगाव, हेळगाव, हणबरवाडी, खराडे, माळवाडी, रिसवड, शहापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांना बसला आहे. काही शेतकऱ्यांना आठ महिन्यांत एकाच विहिरीवरील मोटर दोनदा चोरीस गेल्याचे प्रकार घडले आहेत. आठ दिवसांपासून कालगावचे प्रवीण शंकर पवार, उत्तम शंकर पवार, माळवाडी हद्दीतून शिवाजी देसाई, रिसवडच्या दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्या आहेत. चोरट्यांनी मोटरच्या दोन्ही बाजूचे जोडलेल्या पाइपचे नट बोल्ट खोलून मोटरच नेल्या आहेत.

Crime
मसूर डाळ होणार स्वस्त, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

या मोटारींची किमती सरासरी २० ते ५० हजारांपर्यंत आहेत. शेतकऱ्यांच्या विहिरीवरील, कालव्यावरील विद्युत मोटर चोरीला गेल्यावर पोलिसांत तक्रार देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांची तक्रार लवकर नोंदवून घेतली जात नाही. तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चोरीला गेलेल्या मोटारींची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली असली, तरी अद्याप मोटारीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

Crime
मसूर विभाग पुन्हा हॉटस्पॉट; 23 गावात कोरोनाचा फैलाव

पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान

मसूर पोलिस दूरक्षेत्रात आरफळ कालव्यावरील विजेच्या मोटारी चोरीला गेलेल्या शेतकऱ्यांना तक्रारीसंदर्भात टाळाटाळ केल्याने काही शेतकऱ्यांनी तक्रारी पोलिसांत दाखल केल्या नाहीत. पोलिसांबाबत विश्वासार्हता नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोटारी चोरणारी सराईत टोळी असावी, असा अंदाज व्यक्त होत असून, या टोळीच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com