Satara Maratha Community: 'सातारा गॅझेटियर तत्काळ लागू करा'; मराठा समाज बांधव आक्रमक, अन्यथा उपोषण सुरू करण्याचा इशारा

Warning of Protest: जातप्रमाणपत्र प्रणाली व टिपणी प्रक्रिया एकत्रित करून ती पूर्णपणे ऑनलाइन करावी, सासपडे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा द्यावी, आदी मागण्या लवकरात-लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
Maratha community members protest in Satara demanding immediate implementation of the Gazetteer; warning of hunger strike if ignored.

Maratha community members protest in Satara demanding immediate implementation of the Gazetteer; warning of hunger strike if ignored.

Sakal

Updated on

सातारा: सातारा गॅझेटियर तत्काळ लागू करावे, मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा व ओबीसी समाजात वैमनस्य निर्माण केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून होत असलेल्या कुचराईची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने संगममाहुली येथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या समाधिस्थळी नतमस्तक होऊन मागण्यांसाठी न्याय मिळवून देण्याचा संकल्प केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com