esakal | राजकीय फायदयासाठी समाजाचा बळी देत आहात; मराठा क्रांती मोर्चाचे शशिकांत शिंदेंना खडेबाेल
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय फायदयासाठी समाजाचा बळी देत आहात; मराठा क्रांती मोर्चाचे शशिकांत शिंदेंना खडेबाेल

मराठा आरक्षण म्हणजे काय, हेच शशिकांत शिंदे यांना अजुन समजलेले नाही. गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु आहे. तरी शशिकांत शिंदे म्हणतात, मुक मोर्चापासून मराठा आरक्षणाला सुरवात झाली. यावरुनच त्यांना काहीच माहिती नाही आणि त्यांना आपल्या समाज, मुलांबाबत किती तळमळ आहे. हे देखील स्पष्ट होते.

राजकीय फायदयासाठी समाजाचा बळी देत आहात; मराठा क्रांती मोर्चाचे शशिकांत शिंदेंना खडेबाेल

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलुन, ''स्ट्राँग मॅन'' समजणा-यांचे पितळ उघडे पाडले. आपल्या धन्याचे पितळ उघडे पडत असल्याने शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंचा बोलवता धनी दुसरा कुणीतरी आहे, अशी वेळ मारुन नेण्याची सोयीची परंतु पळपुटी भूमिका घेत करायची म्हणून टीका केली आहे, असे सडेतोड उत्तर मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा प्रमुख समन्वयक व याचिकाकर्ते संदिप पोळ, विवेक कु-हाडे, वैभव शिंदे यांनी आमदार शिंदें यांना दिले आहे.

सर्वसामान्य जनता हीच उदयनराजेंचा धनी आहे. त्यामुळे तुमचे उघडे पडत चाललेले पितळ आणखी किती दिवस सोनं म्हणून दाखवत मराठा समाजाला भुलवणार, मंडल आयोगात मराठा समाजाचा समावेश करण्यास कोणी विरोध केला, मराठा आरक्षणाचा प्रश्न ४० वर्षे कोणी भिजत ठेवला, या प्रश्नांचा आधी उत्तरे द्या, असे आव्हान दिले आहे. 

उदयनराजेंनी केलेल्या आरोपावर आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे आणि ॲड. शशिकांत पवार यांचा बोलवता धनी दुसराच असल्याची टीका केली होती. त्याचा समाचार संदिप पोळ, विवेक कुऱ्हाडे, वैभव शिंदे यांनी घेतला. उदयनराजे कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. उदयनराजेंचा धनी कोणी असु शकेल असे स्वप्नात सुध्दा कोणाला वाटणार नाही. उदयनराजेंचे जे असते ते थेट असते. जे मनात आहे, खरं आहे, ते उदयनराजे बोलणारच.

परखडपणे बोलताना ते कोणत्याही पक्षाची चौकट मान नाहीत. हे महाराष्ट्राने आजवर अनुभवले आहे. शशिकांत शिंदे यांनी सोयीची टीका केली आहे. ही टीका करताना कदाचित ते भांबावले असावते. समाजाची चीड त्या दिवशी उदयनराजेंनी व्यक्त केली. मात्र ही चीड शशिकांत शिंदे यांच्या धन्याच्या सोयीची नाही. उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांच्या धन्याचे पितळ उघडे पाडल्याने मराठा आरक्षणाला खरा अडथळा कोणाचा आहे. हे सुध्दा लोकांना समजलं. म्हणूनच समाजाचे लक्ष विचलित करुन त्यांना भरकटवण्यासाठी शशिकांत शिंदे हे कोणताही आधार नसलेली विधाने करीत आहेत.

उदयनराजेंचे हे म्हणणे हास्यास्पद; शशिकांत शिंदेंचा टाेला

मराठा आरक्षण म्हणजे काय, हेच शशिकांत शिंदे यांना अजुन समजलेले नाही. गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु आहे. तरी शशिकांत शिंदे म्हणतात, मुक मोर्चापासून मराठा आरक्षणाला सुरवात झाली. यावरुनच त्यांना काहीच माहिती नाही आणि त्यांना आपल्या समाज, मुलांबाबत किती तळमळ आहे. हे देखील स्पष्ट होते. त्यांच्या धन्याने केवळ आपल्या व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाला जाणीवपूर्वक डावलले हे उघड गुपित उदयनराजेंच्या नेमक्या प्रश्नांमुळे बाहेर यायला लागल्याने, आरक्षणाचा मुळ विषय भलतीकडे नेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

आमदार शिंदे यांनी लक्षात ठेवावे, राजकीय फायदयासाठी तुम्ही मराठा समाजाचा बळी दिला आहे व देत आहात. उद्या तुमचीच मुले तुम्हाला जाब विचारतील. तेव्हा फार उशीर झाला असेल. मराठा तरुण तुमच्या राजकीय चाली ओळखून आहेत. तो तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

#MarathaReservation : नेत्यांनाे! चर्चा पुरे; आता आश्‍वस्त करा

loading image
go to top